दंगल
दंगल
हाडामासांचा सडा...
विखुरलेला मळा ...
रक्तरंजीत कारट ...
मातीमोल घरट...
दंगल दंगल खेळुन झाल्यावर.....
लाल रक्त सर्वत्र...
ओळखा मग, कुणाचे कोणते गोत्र...
डोह फोडनारे आवाज ...
दिमाखात उभे नेमबाज...
दंगल दंगल खेळुन झाल्यावर...
वरवंटी कपाळ ...
भिरभिरनारी गिधाड...
पोटाला खळगी...
जलनारी थळगी...
दंगल दंगल खेळुन झाल्यावर,,,,
नेत्यांची स्वार्थी राजकारण ...
पातीन जातीच केलेले प्रकरण...
होरपळलेला नि:शब्द जनसामान्य...
नंतर, दंगल सगळ्यांनाच अमान्य...
दंगल दंगल खेळुन झाल्यावर..
