कळत नकळत
कळत नकळत


गाज सागराची ऐकताना
सुसाट वारे...वाहू लागले
सागराच्या...किनाऱ्यावर
तिचेच चैतन्य.....भासले
धून बासरीची वाजणारी
सूर गळ्यातील ते वाटले
गोड गळ्याच्या चाहुलीने
एक एक शब्द..आठवले
मऊशार किनारी वाळूवर
तिचेच शब्दचित्र....वाचले
वाळूवरून चालताना पुन्हा
चलचित्र...आमचे उभारले
कळत नकळत सागराला
नाते मनोमन........भावले
जुन्या तिच्या आठवणींनी
सुख ही मागे मागे...धावले
वाहत्या वाऱ्याच्या..वेगात
कानी सुसंवाद......वाजले
उरल्या आयुष्यात.....सारे
तिचेच बाकी.........राहिले
लेखन : नयन धारणकर,नाशिक