मोरया मोरया
मोरया मोरया


ढोल ताशांच्या गजरात,
बाप्पा घरी आले
मोरया मोरया गणपती
दर्शन तुमचे जाहले ||ध्रु||
एकदंत वक्रतुंड,
सिद्धिविनायक मोरया
भालचंद्र गणाधीश,
वरदविनायक मोरया
देवा जंगी स्वागतास,
भक्तीगीत गायले ||१||
आलो शरण आरतीला,
वाजवित डंका
मंगलमूर्ती गजानन,
नाही मनास शंका
वाढो एकेचि बंधुभाव,
स्मरण जाहले ||२||
योगी गणराज विघ्नेश
भाग्यविधाता
करुणाकरा अधिपती,
हेचि मागणे आता
लंबोदर विघ्नहर्ता,
भाव डोळा साठले ||३||
विश्वंभर शशिवर्णम,
विघ्नराजेंद्र मोरया
शुपकर्ण प्रथमेशाय,
दुर्गेश भूपेंद्र मोरया
सुबक मूर्ती दर्शनाने,
अंतर्मन सुखावले ||४||