STORYMIRROR

Shakil Jafari

Abstract

4  

Shakil Jafari

Abstract

मृत्यू हे शाश्वत सत्य जाण!

मृत्यू हे शाश्वत सत्य जाण!

1 min
486

साधक सच्चा तो

मृत्यूला जाणतो

मृत्यू हे शाश्वत

सत्य जाण!


ज्याच्या डोळ्यापुढे

मृत्यूची सत्यता

नम्रता त्याच्या रे

अंगी सदा!


मृत्यू जाणील्याने

नम्रता येईल

सुटेल व्यर्थ ते

अहंकार!


मला मी अडसर

मला मी बाधक

सत्य जाणायाला

अडथळा!


आधी मीपणाला

मूठमाती द्यावे

समर्पित भाव

अंगीकार!


राग, द्वेष, मद

मत्सर नको रे

करा रे प्रेमाने

व्यवहार!


अज्ञान नेहमीच

मारक ठरेल

भ्रमही ज्ञानाच्या

वाट लावी!


पुण्याई म्हणावे

कृपा अल्लाहचे

अज्ञानाची जाण

सोपा नाही!


प्रश्नात दडले रे

प्रत्येक उत्तर

प्रश्न विचारण्या

बुद्धी कुठे?


प्रश्नांचे प्रत्येक

उत्तर गुरूपाशी

गुरू लाभण्यास

भाग्य लाभे!


आधी करुनी घ्यावे

स्वतःचा बोध

होईल देवाचा

मग साक्षात्कार!


संतांचा अनुभव

हाच धर्मबोध

सेवेने मिळेल

देव त्याला!


शिक्षणाचा लाभ

व्यवहारात रे

अध्यात्म साधना

अनुभवाने!


'शकील' ज्ञानाचा

अभिलाषी पण

आचरण रहित

ज्ञान नको!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract