जर असेल जगायचं... (18)
जर असेल जगायचं... (18)
जर असेल जगायचं
आनंदात
तर आवरा
आपल्या मनाला,
ओळखत राहा
इच्छा आणि गरजांच्या
मधील फरक,
देत बसू नका
इतरांना दोष,
स्वीकारीत राहा
अपयशाच्या काही
जबाबदाऱ्या
आणि आहोभाव सहित
राहा नेहमी कृतार्थ...
