जिद्द
जिद्द
संपून जातो दिवस सारा
झुरल्या उरीच्या आठवणींखाली,
सांज सोन्या या मैफिलींची
घनगर्द काळी रात झाली....
घेते उसासा तरी मग स्वतःशी
मन बंध सारे निखळवू पाही,
शोध घेण्या अन् स्वतःचा
संपणार वेडी जिद्द नाही....
