मनःमंदीर - ३
मनःमंदीर - ३
मन मनाचे मंदिर
तिथे भक्ती केली जावी |
भक्ती कशाची असावी,
भक्ती 'विश्वास' असावी ||१||
मन मनाचे मंदिर
तिथे रांगोळी शोभावी |
रांगोळी कशाची असावी,
रांगोळी 'करुणा' असावी ||२||
मन मनाचे मंदिर
तिथे प्रसाद वाटावा |
प्रसाद कशाचा असावा,
प्रसाद 'आशीर्वाद' असावा ||३||
मन मनाचे मंदिर
तिथे दानधर्म व्हावा |
दान कशाचे असावे,
दान 'सहजीवन' असावे ||४||
~•~
