भयकविता- अकल्पित!
भयकविता- अकल्पित!
घाला पडतो काळाचा
करी 'मणी' मृत्यू प्रहार |
नियतीच्या विवरात बुडाला
तो भाबडा कुसूत्रधार ||
मृत्यूघंटा गर्जत गाई
कालकूटासम गान |
खबरदार रे तुच्छ मानवा
जर करशील प्रारब्धापमान ||
दुष्कर्मांचे हिशेब राखी
मृत्यूसम गर्ता खोल |
सांग मानवा कसा साधशील
स्वप्न-सत्याचा तोल ||
पाप, द्वेषापमानासंगे
जाई खड्ग काळीज छेदीत |
स्थल-कालाचे फासे पलटूनि अवतरिले
अकल्पित... अकल्पित... अकल्पित...

