मनःमंदीर - २
मनःमंदीर - २
मन मनाचे मंदिर
तिथे आरती ओवाळावी |
आरती कशाची असावी,
आरती 'सद्गुण' असावी ||१||
मन मनाचे मंदिर
तिथे भक्त दर्शनाला यावे |
भक्त काय ते असावे,
भक्त 'सत्कर्म' असावे ||२||
मन मनाचे मंदिर
तिथे फुलं उधळावी |
फुलं कशाची असावी,
फुलं 'प्रेम' असावी ||३||
मन मनाचे मंदिर
तिथे धूप दरवळावा |
धूप कशाचा असावा,
धूप 'मांगल्य' असावा ||४||
