सांजवेळ!
सांजवेळ!
जुन्या-सोन्या आठवणी घेऊन आज,
आभाळी खुली सांज फुलून यावी....
पाहुनी बहरते नवरंग उतरणीचे,
नक्षी नयनांची तृप्त तृप्त व्हावी....
वाहुन यावा क्षितिजीचा समीरण,
शांत व्हावी मनीची क्षुधा-आर्तता...
पुन्हा नवे खुलावे चैतन्य प्रेमाचे,
विरुनी जावा पापण्यांचा ओलावा...

