STORYMIRROR

Drkiran Waghmare

Inspirational

4  

Drkiran Waghmare

Inspirational

माणूस

माणूस

1 min
28.7K


माणूस कुठे मिळतो आठवडी बाजारात की मॉलमध्ये

की मिळतो ऑनलाईन संगणकामध्ये

याच माणसासाठी बुध्द,महावीर आणि चक्रधरांनी सोडला राजपाट

आजही माणसातील माणूस शोधण्याचा घातला जात आहे घाट

त्यासाठीच अंतरिक्षात यानांची गर्दी झाली आहे दाट

माणसांच्या गर्दीत आज माणूस हरविला आहे

माणसाच्या शोधासाठीच सारा खटाटोप आहे

या ग्रहावर की त्या ग्रहावर संपणार नाही शोध मानवाचा

अंतरमनरुपी ग्रहावरच पुर्ण होणार आहे शोध मानवाचा

चला तर मग माणसाच्या अंतरमनाचा ठाव घेऊ या

माणसातील माणूस शोधण्याचा प्रयत्न करू या!


Rate this content
Log in

More marathi poem from Drkiran Waghmare

Similar marathi poem from Inspirational