STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Tragedy

3  

Ashok Shivram Veer

Tragedy

आहे भले त्यातच तुझे

आहे भले त्यातच तुझे

1 min
213

आजकाल आपण पहातो की लहान मुलांवर तसेच महिलांवर होणारे अत्याचार हे आपल्या जवळच्या व्यक्तींकडूनच जास्त प्रमाणात केले जातात असे निदर्शनास आले आहे. त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी व आपला बचाव करण्यासाठी त्यांना सावध करण्यासाठी केलेला हा एक छोटासा प्रयत्न...


नसेल अनुभव तुला शिक ऐकायला आई वडिलांचे

आहे भले त्यातच तुझे

करण्या संरक्षण स्वतःचे


तुला कळत कसं नाही

जवळचेच असतात घातकी,

तू काहीही करून स्वतःला वाचव घेऊन फिरकी


आहे गैरसमज हा तुझा

रक्ताचं नातं असतं नेहमीच खरं,

होण्या अगोदर पश्चात्ताप

सावध हे राहिलेलच कधीही बरं


नसतं सोनं हे सारंच पिवळं

पारखायला शिकायलाच हवं,

समजून नात्यातील अंतर

स्वतःला जपायलाच हवं


नसेल अनुभव तुला शिक ऐकायला आई वडिलांचे

आहे भले त्यातच तुझे

करण्या संरक्षण स्वतःचे


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy