कोणाचाच आधार नाय
कोणाचाच आधार नाय
मला आता कोणाचाच आधार नाय,
या जगात मी आता एकटीच हाय
माझी कथा तुला सांगू काय,
संगतीला माझ्या कोणी नाय
माणसा परास माकडं बरी,
ती तरी असती मनानं खरी
ऐकून माझी हकिकत सारी,
मायेनं ठेवला हात खांद्यावरी
प्रेमाच्या बदल्यात देवू तुला मी काय,
मिरच्यांशिवाय दुसरं काहीच नाय
संगतीला माझ्या कोणीही नाय,
माकडानं विचारपूस केली हाय
