STORYMIRROR

Supriya Devkar

Tragedy Others

3  

Supriya Devkar

Tragedy Others

दीनांचा संसार

दीनांचा संसार

1 min
195

नाही हाव महालाची

छत मिळावे डोक्याला

कोरभर भाकरीस

घोर लागतो जिवाला॥१॥

उंची वस्त्रांची गरज

नाही वाटतं आम्हाला 

पोटा पायी लाज आता

बांधली आम्ही वेशीला॥२॥

ऊन वारा पावसाची

 कसली वाटते भीती

गळणाऱ्या छताखाली

 होते रात्र एक रिती॥३॥

नको अपेक्षा मोठाल्या 

जरी निर्धन बापडा

अनवाणी पाय माझे 

अंगी कपडा तोकडा॥४॥

नवा दिवस आणतो

 रोज नव्या आव्हानांना 

स्वाभिमान सरला की 

अर्थ ना त्या मागण्यांना ॥५॥

तरीही जगणे आहे

 आडोसा शोधूनी बरा 

दीनवाणी जीव जरी 

संसार मांडला खरा॥६॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy