STORYMIRROR

Gangadhar joshi

Abstract

3  

Gangadhar joshi

Abstract

माय मराठी

माय मराठी

1 min
239

लागले वेड। शब्दाची कावड

काव्याची आवड। माझ्या घरी


नक्षत्रांचे घड। बंधुनिया धड

अक्षरांची चावंड। माझ्या दारी 


मराठीचा वड। सावलीची आवड

अमृताचा पाड। माझ्या मनी 


मरहट्टा धड। सह्याद्री सांगड 

किल्ले कोट गड। माझे सांगाती


साहित्य पहाड। तोची आधारवड

प्रतिभेची टोळ धाड। मज भावे 


अलंकापुरी झाड। श्रद्धा आहे गाढ 

विठुरायाची ओढ। माझे अंगी


शब्दाचे जोड। अक्षरांची तडजोड 

माझ्यासारखे बिराड। माय भुमी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract