माझी शाळा
माझी शाळा
1 min
292
ज्ञाना चा कलश घेऊनी
सजवु शाळा या भुवनी
ज्योत लावुया ज्ञान दीपाची
धरू कास ही शिक्षणाची
अशिक्षीताची मुळे उपडुनी
सरस्वती च्या या गगनी
शिक्षण हे आईचे अमृत
चला प्राशु या ते मधु घृत
पाजुनी सर्वाना ज्ञानामृत
नाचु बागडु या नंदनवनी
लोक शिकले झाले शहाणे
गाव सुशिक्षित सदैव रहाणे
करू राष्ट्राची अशी प्रगती
उच्च शिक्षित साधी राहणी
सजवु शाळा या भुवनी
अमृताचा कलश घेऊनी
