हनिमून
हनिमून
1 min
267
दिवस असे हे फिरायचे
करोना व्हायरस ने मरायचे ।। ध्रु ।।
नुकतेच झाले लग्न
प्रेमात झालो मग्न
त्यातच आले विघ्न
हनिमूनला कसे आम्ही जायचे
करोना व्हायरस ने मरायचे
कशी तर मिळाली रजा
करायची होती मजा
चिन्यांनी दिली ही सजा
दिवस कसे हे मिरवायचे
करोना व्हायरस ने मरायचे
घरातल्यांचा नुसता ताप
झाला सर्दी शिंका चा कोप
वट वाघळा नी दिला शाप
हेलपाटे दवाखान्यात मारायचे
करोना व्हायरस ला भ्यायचे
दिवस असे हे कटायचे
कोरोना व्हायरस ने मरायचे