STORYMIRROR

Gangadhar joshi

Others

3  

Gangadhar joshi

Others

वैष्णव

वैष्णव

1 min
255

श्रीमान अण्णा हजारे,


शतजन्माचे पुण्य लाभले अवघ्या

महाराष्ट्रात 

दीप हो दिसला अंधारात।। धृ ।।


तमोगुणाचे जाळे भेदीत

भ्रष्टाचार हो जाळून टाकीत

नीतिमत्तेची कास ही धरून

आला हा यतीराज।। 1 ।।


यतीराजाच्या दिव्य आगळे

नष्ट करून हो डोमकावळे

पुराव्याचे विणता जाळे

गवसे मासे गळात।।2 ।।


वारकरी हा पंढरीचा

खडतर मार्ग चाले साचा 

मातृभूमीचा सैनिक सच्चा

जन्मला राळेगण नंदनवनात।।3 ।।


भगवी पताका खांदी घेऊनी

नसे पक्ष ना राजकारणी

समतेचा हा नारा गाऊनी

कीर्तन करी जन मानसात।। 4।।


नैतिकतेचे तेज हे न्यारे

दिपवुनी राज्यही सारे 

सिद्धी करुनी राळेगण बारे

नाचतो वैष्णव आनंदात।। 5 ।।


दीप हो दिसला अंधारात।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन