विरह
विरह
श्वास घेवून जिवंत ठेवेल, गुदमरून मरु पाहणार्या हदयाला..
सहन करेल स्वर्गाची चाहूल लावून,नशीबी आलेल्या नरकयातनेला..
जाळून टाकेल तु धडा शिकवलेल्या, त्या खोट्या प्रेमाच्या आश्वासनाला...
पुसुन टाकेल डोळ्याच्या कडा पाणावणार्या,कडू गोड आठवणींच्या सागराला...
स्वप्न समजून विसरुन जाईल, आपण एकामेकांसोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणांला...
समजून सांगेल मी तुझ्या भूलथापांना बळी पडलेल्या मनाला...
तु मांडलेल्या प्रेमाच्या तमाशात मी असेल तुणंतुणं वाजवायला...
समाजातील लोक टपून बसलेय दाद न देता खडे मारायला...
सर्व सोडून मी जातोय नवीन आयुष्याच्या भरकटलेल्या नावेच्या प्रवासाला...
तु फक्त खुश रहा हसत रहा, माझ्या शुभेच्छा सदैव असतील तुझ्या सोबतीला...
चिंता करु नकोस मी सावरेल स्वताला...!!
