STORYMIRROR

Manisha Wandhare

Abstract Romance

3  

Manisha Wandhare

Abstract Romance

मन गंध गंध ...

मन गंध गंध ...

1 min
130


मन गंध गंध श्वास धुंद धुंद ,

हरवुनी मी जाते दूर का ?,

माझ्यात मी नाही जरी ,

तुझ्यात दिसते माझं प्रतिबिंब का ?...

ना कळे मला वेड लागे जीवा ,

तूच तू सभोवती माझ्याच का ?,

क्षणा हरवते क्षणा गवसते ,

हे वेडे तराणे असे भारावलेले का ?...

दिसे ना मला भास पुन्हा ,

चंद्रपावली चाहूल तुझीच का ?,

बावरी ही कळी फुलते उरी ,

स्वप्न फुललेले ओवते धाग्यात का ? ...

मी नदी बांध तोडुनी वाहते ,

उधाण आले आज भावनांना का ?,

काही असेच होते जेव्हा प्रेमात पडते ,

वळण दुःखाचे जरी वाटते स्वर्ग सुख का ? ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract