अन् हाय हे अंतर ...
अन् हाय हे अंतर ...
कितीदा हरवले मी ,
बोलता-बोलता तुझ्याशी ,
तू हसूनी टाळतो मला ,
का ?मी नाही तुला पाहिजे तशी ...
हरवता मी भानावर येते कधी ,
आजूबाजू हे तू नसतोस ,
का ? सोडून देतो मला एकटी ,
दूर दूर तू निघुन जातोस ...
तुझ्या मनाची काहिली ,
तू मला सांगतोस ,
माझ्या मनाची कळे ना तुला,
विचारू का ? ,
तू मला आपलं मानतोस ...
बोलून जा एकदा हे ,
बोल ऐकण्या अनावर ,
ओठ अधीर टेकाया ,
अन् हाय हे अंतर ...

