आसक्त मन
आसक्त मन
मनाचे चोचले आयुषभर पोसले
मरताना मी मज स्वतःलाच कोसले
लहानपण गेले खेळ खंडोबा करण्यात
आई बाप म्हणे लक्ष घाल अभ्यासात
अभ्यासाची ओढ मनाला काही लागेना
मी मज स्वतः मनमौजी आचारताना
अभ्यास विषयाचा पण पाठ्यपुस्तकांचा
मग विषय म्हणे "मनाला" , आहेच तसा मी शहाण्या बुद्धीचा
ही बुद्धी मी पुस्तकातून विकत घेतली
मज नव्हती तेव्हा या विषयाप्रती माहिती
हेच विषय मग तारुण्यात भौतिक सुखे देती
आणि हेच विषय नंतर मला विष देती
मी विषयाचे विष प्यायला आसुसलेला
माझेही मन आतुर ह्या विषयाप्रती विष प्यायला
होता होता म्हातारपण उंबरठ्यावर आलं
पण विषाप्रती मन आसक्त झालं
किरणकुमार उरकुडे
