*कुंडलिनी *
*कुंडलिनी *
निर्गुण पाहता रूप तुझे मणी
त्या आत्मनिल प्रकाशात न्हाऊन निघालो मी !
नको तो आनंदी क्षण भौतिकाचा
आतच माझ्या सापडला खजिना परमानंदाचा !!
मूलाधारातून तू मला जागवीस
जणू ३ १/२ कुंडल मारून बसलीस !!
शक्तीच ते रोद्र रूप मला दाखविस
क्षणात त्या सापासारखी फुत्कारलीस !!!
ऊर्जेचं ते प्रचंड स्तोत्र खुलवलीस
नेत्र झाले माझे दर्शनीय मनोमनीस !!!!
मूलाधार ते आज्ञाचक्राचा तो प्रवास अद्भुत
शब्दच सुचेना मला ते आठवून !!!!!!
आज्ञाचक्रात माझ्या स्थिरावून
दाखविसी मला तुझे रूप खुणावून !!!!!!!
रोमांच होता क्षणोक्षणीच त्या ७ चक्रांचा
युगे युगे शक्तीचे शिव मध्ये मिलन होता !!!!!!!!
उघडले माझे तू द्वार मोक्षाचे १० व्या द्वाराचे
सुटले मर्म कर्म आणि चर्म या जीवनाचे
किरणकुमार उरकुडे
