# निदान मनाचे #
# निदान मनाचे #
रोग जडला तणांचा नव्हे मनाचा
शोधाशोध केला प्रश्न आयुष्याचा ! १ !
विचारता निदान काय बर याचे
ना मिळे उत्तर कुठल्या वैद्याचे ! २ !
बुआ , फकीर देवळात जाऊन मी रिकामा
शोधा शोध करून बसता केविलवाणा ! ३ !
कुठून आवाजाचा मला भास होता
बघतो तर हुबेबुब माझाच चेहरा मिळता ! ४ !
खांद्यावर ठेऊनहि माझ्या हात बहुरुप्याचा
निदान कुणीतरी आधार दिला मनाचा ! ५ !
मग बाहेर का शोधता निदान मनाचा
दळले उत्तर आतच अज्ञान या जीवनाचा ! ६ !
देवरूपी माझा मीच मला भेटलो
निदानाचे उत्तर मिळून आतच गहिवरलो ! ७ !
किरणकुमार उरकुडे
