STORYMIRROR

kirankumar urkude

Others

3  

kirankumar urkude

Others

भक्ती रूप

भक्ती रूप

1 min
164

रूप बघता श्री दत्त आपुले 

संचारत नवचैतन्य हृदयात फुलले ! १ !


स्मरत आपणासी यावे तुम्ही धावुनी 

असे श्री गुरु कृपाळू दया दाखवुनी !२!

 

चैन न पडे स्मरता श्री दत्ता 

जीव कासावीस जसा पाण्याविना तो मांसा ! ३ !


बोध करता दीप लावुनी ज्ञानाचा 

कळला हा देह प्रकाश हा आत्म्याचा ! ४ !


कृपा सदैव असू द्या मजवरी 

लीन होऊनि माथा तुझ्या ठायी ! ५ ! 


ना उरली कसली चिंता ह्या देहाची 

स्मरतां आव्हान करा श्री गुरुदत्ताची ! ६ ! 


किरणकुमार उरकुडे ( दत्त भक्त ) 



Rate this content
Log in