योद्धा
योद्धा
देउनी आशीर्वाद डोक्यावरी धाडी माय सीमेवरती
दिसे त्या नेत्रांतुनी डोळयांतील अश्रून्त बिंब उमटती
न पडती अश्रू डोळ्यातून मायेच्या, जाता हात फिरवी पाठीवरी.
करुनी लाड घेऊनी आलिंगणी हातानी चुंबन करी माथ्यावरी.
लावूनी विजय टिळक आज्ञापरी देई मंत्र कानातुनी,
देउनी हातात ठेऊन माती कर रक्षा या जन्मभूमीची.
उत्साही होऊनी माय धाडती त्या सीमेवरूनी
चेहऱ्याचा तेज आईचा घेऊनी सळसळते रक्त त्या वाहिण्यातुनी.
आहे सज्ज मी मराठा शिव छत्रपती महाराजांचा
करावया आलो रक्षण मी पुत्र आहे या मातृभूमीचा.
