मी आवाज तुला दिला...
मी आवाज तुला दिला...
मी आवाज तुला दिला ,
तू ऐकुनी ना ऐकला ,
निघून गेला जीवनातून माझ्या ,
हा प्रवास माझा एकटा पडला ...
शोधते तुझ्या वाटेवर ,
परतुनी येशील कधी,
दीप मालवुणी गेलास,
दीप उजाळीत येशील कधी ...
अंधाऱ्या वाटेत हरवले,
प्रेमाचे दोन मन तोडले ,
आता ना विश्वास राहिला ,
का ?असा घात नियतीने केला...
परतिचा मार्ग हरवुनी गेला,
मीही तुझ्याकडे कशी येऊ सांग जरा ,
खांद्यावर माझ्या हा पसारा ,
अन् तू एकटी वर भार टाकुनी गेला ...
