तु जवळ येता ...
तु जवळ येता ...
तू जवळ येता
जिंदगी भेटायला येते
तू हसूनी बोलता
श्वास श्वास घेते
तुला माहीत नाही तू
तू मला जगण्याचे कारण देते
तू आहेस म्हणून मी
माझ्या जीवनाला भेटते
तूच तू तूच तूच तू
वातावरण भारावलेले ते
तुझ्याशिवाय नाही कुणी
माझ्यात मी तुलाच भेटते
चल सोबतीने चालू
पावले पावलांना विचारते
क्षितीजापलीकडे ही दुनिया
मला प्रेमात दिसते

