रात्र ओली ...
रात्र ओली ...
धुंद चांदण्यांनी नाहलेली ,
रात्र नक्षत्रांची ओली ओली ,
कवडस्यांचा लपंडाव इथे ,
शोधिते चंद्राची सावली ...
पारिजात गंधाळलेला ,
ओल्या रात्रीत बहरला ,
सांडला अंगणी माझ्या ,
सुगंध तना मनात गंधाळला ...
मी सांज सावरी ,
तो सूर्य उजाडलेला ,
तरी वाट त्याला माझी ,
क्षितिजावर अबिर उधळलेला ...
पाण्यात साठवून गेली ,
आठवांची कांती ओली ,
शहरून जाते लाजरी काया ,
जेव्हा ऐकते पैंजणाची गोड बोली ...

