दिपावली
दिपावली
साफसफाई झाली दिवाळी आली,
विद्युत रोषणाईने घरे ही सजली.
आकाशकंदील लावियला दारी,
फराळाची तयारी सुरू घरोघरी.
गंध हा दरवळला सुगंधी उटण्याचा,
अन स्पर्श हा मऊ मोती साबणाचा.
करुनी अभ्यंगस्नान लहान थोर,
घेऊ लागले आनंद फटाक्यांचा पोरं.
लवंगी सुतळी फटाक्यांचा आवाज,
लाडू करंजी शेव चकलीचा रिवाज.
लक्ष्मीपूजनाला ती कुबेराची खाण,
प्रसादाला असे अनारस्यांचा मान.
दिवाळी सण पती पत्नीच्या प्रेमाचा,
तोही सण बहीण भावाच्या नात्याचा.
जाईल दिवाळी अशी निघून,
आनंदाची खैरात साऱ्यांना वाटून.
अशोक वीर
