घ्यावे जाणूनी संदर्भ
घ्यावे जाणूनी संदर्भ
झरा वाहे झुळुझुळू
ध्वनी मधुर मंजुळ
वृक्षवेली पाने- फुले
मना घालीसी भुरळ
तृष्णा सृष्टीची भागवी
झरा निर्मळ सुंदर
वाहे द-या खो-यातूनी
कृपा तयाची अपार
झरा ममतेची ऊब
साऱ्या जिवांचा आधार
हर्ष पेरूनी अंगणी
देई पवित्र्याचा सार
स्थिर डबक जलाच
तिथे साम्राज्य दुःखाच
घ्यावे जाणुनी संदर्भ
चित्र भेदक विश्वाच
देण सृष्टीचं वाचवा
त्यात भविष्य उद्याच
झरा होऊनी जीवनी
जीन व्हाव सत्कर्माच
