तु एकदा हो म्हण ...
तु एकदा हो म्हण ...
तू एकदा हो म्हण
तर काहीतरी होईल
नाहीतर मी एकटी तू एकटा
असे किती दिवस जाईल
रोज धरून अबोला
तरी भेटतोस मला
चालता समांतर तुला
पावलांचा पावलांना इशारा
या अबोल बोलक्या डोळ्यांना
तू वाचून घेशील
एकदा माझ्या जागी तू ये
म्हणजे मला सखे
तू समजून घेशील
मी नाही नुसता दिवाना
तू ऐकुनी वेडावून जाशील
प्रीतीची माझ्या खोली
मोजली तर हरवून जाशील
तू एकदा हो म्हण ...