वंचना मनाची ...
वंचना मनाची ...
ही वंचना मनाची ,
प्रेमात सुखावलेल्या पाखरांची ,
भेटूनी गिरकी आकाशात घेता ,
क्षणात ताटातूट जीवनाची ...
रडणे आम्हा नशिबात का ? ,
वारा सुखाचा वैरी ,
स्वर्ग अवतरला क्षणात ,
क्षणात आयुष्य वैरी ...
दुरावा जाळते दिन रात ,
वैरण रात्र भरात ,
हुंदके दाटूनी चंद्र ,
वाट भुलला काळोखात ...
शरीर जिवंत मन मरते ,
ना आवड ना सुख दिसते ,
आता जगते , फक्त जगते ,
का नेहमी असेच होते ...
ही वंचना मनाची ,
प्रेमात सुखावलेल्या पाखरांची ,
भेटूनी गिरकी आकाशात घेता ,
क्षणात ताटातूट जीवनाची ...

