लक्ष्मी माझ्या घरची...
लक्ष्मी माझ्या घरची...
लक्ष्मी माझ्या घरची ,
जशी सर पावसाची ,
भिजते सर्व मायेने ,
ती गाय वासराची ...
तिच्या ममतेचा पान्हा ,
उपाशी नाही तान्हा ,
साऱ्या घरात प्रकाश ,
उजाळला कोन्हा कोन्हा ...
अंगणात जाई जुई मोगरा ,
तिच्या श्वासापरी गंधाळला,
सुहासिक करे घरा दारा ,
प्रकाश गाभाऱ्यातुनी आला ...
पणती ती माझ्या मनी,
मंद धुंद फुलराणी ,
लक्ष्मी माझी सगुणी ,
हसते काजळी सारूनी ...
