STORYMIRROR

Sharad Kawathekar

Abstract

3  

Sharad Kawathekar

Abstract

निनावी वादळ

निनावी वादळ

1 min
304

वेगवेगळ्या नावांनी सजलेलं तरीसुद्धा ते

वादळ निनावीच 

वर्तमानाच्या मुखपृष्ठावरचं उमेद भरणारं

कधी वसंताची पालवी घेऊन येणारं तर

कधी आभाळाला सोबत घेऊन येणारं


त्या वादळाला

ना घर ना दार

ना सुरूवात ना शेवट 

कधी टेकडीवरच्या पाऊल वाटेनं येणार 

तर कधी समुद्राच्या लाटांबरोबर येऊन 

परसदारातल्या चाफ्याजवळ विसावणारं


स्वाभिमान वेशीवर टांगून येणारं

एखाद्या स्वार्थी हतबल माणसासारखं

रांगत रांगत जगणारं

जगत जगत माणसांच्या काळजात शिरणारं

संवेदना जीवंत ठेवायला लावणारं एक 

माणसाळलेलं वादळ 

येणाऱ्या बेहिशोबी अश्रूचे 

हिशोब मागणारं वादळ 

मौनातच मौनाशीच संवाद साधणारं

एक निनावी वादळ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract