घरपण...
घरपण...
घराचं घरपण जपणारं
सहकुटुंब आपलं
भावनांना समजून घेणारं
असं प्रत्येक नातं
त्यात आभासी नात्याचं
जडपण नाही कधी
मनाचा मोठेपणा जपणारे
सगळेच हवेहवेसे
प्रत्येक नाती कसोशीने
टिकवणारं संशोधन
नाती गुण्यागोविंदाने
सतत फुलवणारं तंत्रज्ञान
सहनशीलतेचा दागिना
समजूतदारपणाचा
चुकांना विसरभोळेपणाची
अनोखी जोड अशी
मत मांडण्याचा
एकसमान सर्वाधिकार
वर्चस्वाचं नाही
असह्यकारी अंधारी पांघरूण
वादविवादांचं नाही
कधी ताटातुटीत रूपांतर
तर्कशुद्ध हेतूंनी प्रसन्नतेनं
वाढलेलं कुटुंब
