STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract

3  

AnjalI Butley

Abstract

त्यांचे तर कर्तव्यच आहे

त्यांचे तर कर्तव्यच आहे

1 min
303

स्व मर्जीने जन्म दिला मला

आता माझे सर्व करण्याचे

त्यांचे तर कर्तव्यच आहे

माझे पालन पोषण करण्याचे


मला त्यांचे काही करण्याचे

कायद्याने घातलेय बंधन

पण कायद्याच्या बंधनात

अडकणार नाही आता


त्या आधीच त्यांच्याशी

करून घेईन करार

फारकत घेईन मुलाच्या नात्याचे

लावेल त्यांच्यावरच नविन दावे


नाही घ्यायची मला त्यांची जबाबदारी

पण हवाय सारा त्यांचा पैसा मला

स्व खुशीचा संसार माझा 

नको त्यांची लुडबुड


आहे ही नविन पिढीतल्या मुलांची मानसिकता

कुठे गेली ती नितीमत्ता ज्याचा होता आमच्या समाजाला अभिमान

नसे लागे कुठे गिरवावे धडे

रोजच्याच सहजतेने वागण्यातच सामावले असे सारे जीवन गाणे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract