STORYMIRROR

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

3  

Neha Ranalkar(Nawate)

Abstract

कवितेवरच कविता

कवितेवरच कविता

1 min
320

तुझ्या माझ्या नात्याला नाव काय

मी देऊ?

आक्षेपार्ह नसता दोष माथी का तो

घेऊ?१


वय,जात,लिंग,धर्म,यांच्याही पलिकडचे नाते|

भेटीची लागता तुझ्या आस मला विसरून जाते||२


नाही राधा,मीरा की सत्यवानाची सावित्री|

तुला ही ना कळलेली एक वेडी कवयित्री||३


तुला शब्दांत पकडतांना वाटे मीच गं कैद झाले|

आशयात नकळत तुझ्याही मीच बंद का झाले||४


स्तुती सुमने नकोत मजला घाली वरमाला|

पैठणी तुझी नेसता श्रीफळ,शाल कशाला?|५


तूच काव्य,तूच छंद,माझी तूच स्फूर्ति|

मज नको किर्ती,राहो अंतरी तुझी मूर्ती||६



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract