STORYMIRROR

Pavan Kamble

Abstract Tragedy

3  

Pavan Kamble

Abstract Tragedy

स्मशान आणि शांतता...

स्मशान आणि शांतता...

1 min
551

देह माझं आज सजल होत

नटून थटून तिरडीवर 

शांतपणे ते निजल होत..


शांत झोपलेलं पाहून मला

उठवायला हे सारं गाव आलं होतं..

अबोल पाहून मला

सारे काहीतरी बोलत होते...


छातीवर पडून माझ्या

जवळचंच कोणीतरी रडत होत

रडता रडता डोळ्यांतील अश्रू

अलगत माझ्याच गलावरत लोळत होते..


शेवटचं मला पाहण्यासाठी

जवळचे माझेच जिवलग होते

चार खांद्यावर घेऊन मला

गावात साऱ्या ते मिरवत होते..


जातोय आज मी स्मशानाच्या दारी

म्हणून स्मशान लाकडांनी सजवलं होत

अन मला त्या लाकडावर

निजवल होत...


नेहमीच हसणारा चेहरा माझा

आज शांत कसा झाला

स्मशान ही आज थोडा अबोल

झाला होता...


प्रेत माझे जळताना पाहून

आज स्मशानही थोडा

शांत झाला होता..

थोडा शांत झाला होता...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract