गाडी निघाली
गाडी निघाली
पान कोवळे, फुल कोवळे,
फळा कवच जाडे जाडे.
कवचाआड गर स्वादभरे.
ढग काळे, आकाश निळे,
गार वारे,पाण्यानी भरले,
ढग सारे सारे, उंचावर तें,
ढग काळे काळे.
ऊंच पर्वत, वृक्ष हिरवे,
नदी वाहते खळखळ बरे,
ते पहा पाण्याचे सरोवरे.
फुल हसते,वेल मंडपी चढे,
फांदीला तिच्या काटे बरे,
फुलावर पहा पराग पिवळे.
चमकते चांदणी, चंद्र हसरा,
आकाशी तारांगण लागे,
पहा ते माधुचंद्राचे चांदणे.
थंड हवा, शिवार हिरवा,
ऊन कोवळे,पहा गवतावर तुरे,
चला भरू पाण्याचे घडे.
हिरवा चुडा, हळद पिवळी,
मंडपी झालर हाले,
आता सावधान समय बरे.
ऋषीं मुनीचा देश हा,
रामायण, महाभारत,
येथे घडे.
मिळती, संसस्काराचे धडे.
नका होऊ व्यसनी बरे,
पोरी गाडी निघाली,
तुझी सासरकडे.
