STORYMIRROR

Gopal Ingle

Abstract

3  

Gopal Ingle

Abstract

दूर दऱ्या डोंगरांनी

दूर दऱ्या डोंगरांनी

1 min
318

दूर दऱ्या डोंगरांनी

आज पांगलं आभाळ

लाल पळसफुलांच्या

गेले देठांत काजळ


वैशाखाच्या ऊन्हामधी

भूई भेगाळली फार

पाझरल्या धामोडीला

जड डीघाचा उतार


सोनसळ्या ऊन्हामधी

वाटा झाल्या लाजवंती

वल्या पळस फुलांना

बाता बोलते शेबंती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract