STORYMIRROR

Gopal Ingle

Romance

3  

Gopal Ingle

Romance

कळवळल्याचे बळ

कळवळल्याचे बळ

1 min
329

ती झुडपाच्या आडोशात मला भेटायची

पानांचा आधार घेत

थोडे शब्द बोलायची


ती बोलताना थोडा छळवादपणा करायची

हातात हात घेऊन

पुन्हा गळ्यात पडायची


रानामधी पिवळ्या पानांचा पुन्हा बोलबाला

पळसाच्या फुलातुनी

चिंब फाल्गुन रंगला

तिचे दूर दूर जाणे जड वैशाखी उन्हाला


तिच्या बाहुतली भेट

ओली श्रावण झडीला

तिच्या रुसल्याने रुसले आषाढी आभाळ

तिच्या डोळ्यातूनी गेले

काळ्या मातीला काजळ

काळ्या मातीला काजळ माझ्या काळजाला कळ

कळवळल्याचे शब्द

देते जगण्याला बळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance