STORYMIRROR

Gopal Ingle

Others

4  

Gopal Ingle

Others

पाहात तुला मी फिरतो गं

पाहात तुला मी फिरतो गं

1 min
333

रानांच्या पानांत

पानाच्या फुलांत

पाहात तुला मी फिरतो गं


श्रावण झडीत

हिरव्या झाडीत

शोधित तुला मी फिरतो गं


फाल्गुन उन्हात

पळस फुलांत

रानांत पानं झडलंय गं


आषाढ बनात

नादिली पानांत

चांदण टीकोर पडलंय गं


चिंबलं आभाळ

मातीला काजळ

हाताची ओंजळ भरतोय गं


रानाच्या पानांत

पानांच्या फुलांत

तुझंच नाव कोरतोय गं


Rate this content
Log in