का असे निथळत जाते
का असे निथळत जाते
का असे निथळत जाते
संध्येचे पाऊलपाणी
भिजवून मलाही जाती
अस्वस्थ कुणाची गाणी
संध्येस न कळली रात
संध्येस न दिवस उमगला
तुटले घरटे तरी यावे
संध्येचा पक्षी वदला
दिशांचे हरवता भान
पाऊलही होते परके
येण्याचे ओझे होते
जाण्याने झाले हलके
