प्रेम बिम सगळं झूट
प्रेम बिम सगळं झूट
चंद्र बिन्द्र, तारे सारे
नक्षत्रांची खिड़की दारे
तुला हवी का वा रे! वा रे!
नशिबी माझ्या तूफान वारे
म्हटल उठ निघ निमूट
प्रेम बीम सगळ झूट
नंतर एकदा भेटली पुन्हा
क्षितिज संध्या खुणावतांना
मी रे राधा तू हो कान्हा
बघू सुखाचे सरप्लस होताना
असेल सरप्लस तरीही तूट
प्रेम बिम सगळ झूट
म्हणे लावू चंद्र झोपड़ीच्या दारी
च्यायला म्हणजे पुन्हा उधारी
दोन वेळची मारामारी
त्यात तिच्या चारोळ्या चारी
फाटक जिण त्यातही लुट
प्रेम बिम सगळ झूट
आपलेच ओठ आपलेच दात
हसेल वेळ असेल साथ
कशाला वेडया उद्याची बात
दे वचन हा घे हात
तिच्या हाती नकाराची एक चिमुट
प्रेम बिम सगळ झूट
बसेल फास, धसेल श्वास
'तू है पास' तर असेल आस
पटले आता माझ्या मनास
चार डोळ्यात थेंब खास
येतच राहतील उठसुठ
प्रेम बिम सगळ झूट??
