उध्वस्त दिशा
उध्वस्त दिशा
भकास सूर्य
उध्वस्त दिशा
मोकळा ढाकळा उजाड रस्ता
अस्ताव्यस्थ पसरलेला
अनेक छोट्या मोठ्या
पायवाटा त्या रस्ताला मिळालेल्या
त्याच्यावरूनच पुढं पुढं जायचंय
कधी पळत
कधी रांगत तर
कधीकधी सरपटत
वाटेत जरी असली
उष्ण वाळू , भयाण जंगल
किंवा पाणीच पाणी ..
पुढे पुढे जातोय खरा
पण...
अडकत जातोय मागं राहिलेल्या
त्या बंधनात
त्या नात्यात आणि
त्या प्रेमात
आणि मग ...
पोखरत जातो
कुरतडत जातो
जळत जातो
त्या भकास सूर्याच्या लोळात
हरवत जातोय या उध्वस्त दिशांत
