हरपले सप्तसूर
हरपले सप्तसूर
कल्पतरु कन्येसाठी
लावे दीनानाथ तात
सरस्वती कंठामधे
वरदान जन्मजात
बहरले सप्तसूर
जगी कानाकोप-यात
गान कोकिळेचे वसे
रसिकांच्या हृदयात
यश कीर्ती उत्तुंगचि
सदा लीन नि विनम्र
गौरविले पुरस्कारे
परि साधनेत व्यग्र
एके दिनी अनंतात
सप्तसूर हरपले
कोट्यावधी रसिकांच्या
हृदयाचे पाणी झाले
लता देहरुपे गेली
कीर्ती अमर राहिली
सूर महिमा ठेवूनी
अनंतात हरपली
अखंडचि स्वरनाद
नित्य जगा सुखावेल
स्वररुपे चिरंजीव
स्वरलता बहरेल
