सांगे मला
सांगे मला
जे जे बघते ते ते सारे
मम प्रतिभेला भावते
लेखणी मजला सांगते
सर्व मीच उतरवते
कधी निसर्गाची किमया
मुग्धच मनाला करते
कधी कोणाच्या भावनांचे
आलेख लेखणी चितारते
भावभावनांचे गोफ हे
अलगद मना भिडती
चित्रण कर अलवार
त्वरेच सांगते लेखणी
जिवाभावाची ही सखी
प्रतिभेची दूत बनते
काव्यसंवेदना देऊनी
लिहायला मज सांगते
साथ मज आयुष्यभर
हवीच लेखणी सखीची
सेवा साहित्याची अखंड
कृपा लाभो सरस्वतीची
