माझ अबोल प्रेम
माझ अबोल प्रेम
प्राजक्ताच्या पायघड्यांवर
ठसे दिसता तुझ्या पावलांचे
सुंगधात लपलेली तु
असे नेहमीच मज वाटायचेे
सतेज कांती अन
रूप तुझे नशिले
मनी ठरवले आता
तुझ सोबत न वाहायचे
माझ्या पासून तुलाच आता
स्वतःस आहे जपायचे
वसंतासही वेड लागेल
अस प्रेम आहे करायचे
तुझ्या चेहर्यावर नव्याने
प्रेमरंग पुन्हा आहे फुलवायचे
मैफिलीतील क्षमा असोनी
सोड तु इरादे जळवायचे
तुला शायरीमधूनी माझ्या
अजूनही आहे मिरवायचे
कळत असूनही तु
का न कळल्यासारखे वागायचे
अशाने माझ अबोल प्रेेम
सांग कोणत्या शब्दात
व्यक्त मी करायचे??

