हि माणसे
हि माणसे
गोड गोड बोलणे ,काळीज पिळवटून टाकते
कधी आपल्यासाठी आतडे ,तुटते का हो यांचे..
प्रेम करण्यापेक्षा ,जो तो देखावा करेल
कधी घरात विश्वासाच्या बाता ,करतील का हे..
प्रत्येक जण चार हात, अंतर ठेवून वागते
मीच जवळचा म्हणून, मोठ्या तोंडाने सांगे..
वागण्यात नाही मेळ, नि हातभर गोडवे
तुझे तू बघ ,त्यात नाही माझे भले...
कोण खरा कोण खोटा, काहीच न कळे
बोलांचाच पसारा ,नि आपुलकीला पारखे...!!!!
